सुख - दुःख अन नाती - गोती
कोण जपतो कोणासाठी ..?
रीवाज नाही बस उरल्या रीती ..
अर्थहीन शब्द फक्त उरले ओठी
उरली ना माणसे ... ना उरली नीती
धर्म आमुचे वेगळे तरी पुन्हा जाती
पाप पुण्याची दावत भीती ...
उगा रावळी जळत्या वाती ...
सहून उपवासाच्या वेदना
करीतो आम्ही पूजा अर्चना
पळतो दिवस, वार, महिना
पण पावत नाही देव कळेना ..?
मुखवट्यांचे आमच्या झाले चेहरे
जगण्यास न उरले अर्थ गहीरे
वरवरचे बोलणे आणि वरवरचेच हसणे
आरश्यात पाहताना त्यात माणूस शोधणे .....
- अथांग