कधी कधी वाटते हे वास्तव नाही
कारण डोळ्यांना जे दिसते ते खरे वाटत नाही
म्हणून जखमेवरची खपली मी हळूच काढतो
आणि जखमांच्या धाग्यांनी वास्तवाला बांधून ठेवतो
यातना मला जाणीव देतात मी जिवंत असण्याची
पण हा शावचोस्वास मला खोटा वाटतो
मी सर्व सोडून पळण्याचा प्रय्तन करतो
पण नंतर मला दिसते मी तर त्याच दिशेला पळतो
ज्यांची ज्यांची मला गरज होती
तेच मला सोडून गेले
ज्यांचाशिवाय माझा दिवस उजाडत नव्हता
तेच चेहरे आता अनोळखी वाटतात
कारण ते चेहरे नव्हते तर मुखवटे होते
आपलेपणा मागे लपलेले स्वार्थ होते
म्हणे समय सर्वात मोठे औषध आहे
पण ते हि जणू काय लागू पडत नाही
स्मृतीवरचे डागही धुतले जात नाही
कधी कधी वाटते हा श्वास जणू थांबवा
नसा नसामध्ये फिरणारा विषप्रवाह थांबवावा
पण हृदयाची धक धक हा विचार थांबवते
आणि पुन्हा आयुष्य एकदा हाक मारते
----- किरण कुंभार