शेतकरी:
आपल्याच दुखाना आपुलकीची किनार लाभत नाही,
फाटक्या संसारात लेका पोरांना विजार लाभत नाही.
हे जगन गरीबीच पाचवीला
पुजलेलं, राब राब राबून उनात राती उपाशीच निजलेलं.
भाकरीची आस होती ती हि मिळणा,
कसला ह्यो देव त्याला काय बी कळना.
उभ्या आयुष्यच एकच मागणं,
नक हे मायबापागरीबीच जगणं
आता डोळे मिटाव, अन, परतीला लागाव,
जसा आलो तसा जाणार , अन आता काय मागावं.
मैत्रेय