तो फक्त आमचाच विचार करायचा,
आपल्या परीने कष्ट करायचा,
त्याच्या कडूनही चुका झाल्या,
तो हि माणूस होता.
संसाराची परवड त्यालाही बघवत नव्हती,
खूप काही करायचं अशी इच्छा होती,
खूप काही सहन केलं,
तो हि माणूस होता.
स्वताचा कधी विचार केला नाही
आजार कधी कळलाच नाही,
तरीही शांत होता
तो हि माणूस होता
अखेर ती वेळ आली
अशी छातीत कळ आली.
शांत निजून गेला
तो आमचा बाबा होता
शेवटी तो हि एक माणूस होता .
मैत्रेय.