Author Topic: ते एक उदध्वस्त शहर...  (Read 1420 times)

Offline jayashri321

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
 • Gender: Female
 • माझ्या कविता..मझ्या ह्रदयातली स्पंदनं.
ते एक उदध्वस्त शहर...
« on: July 07, 2011, 01:18:48 PM »
माझे अश्रू, माझ्या वेदना घेऊन..

शोधत राहते,धुंडाळत राह्ते

त्या उदध्वस्त शहराचा कोपरा अन् कोपरा..

त्या शहराच्या वेशीवरच,

टांगलेली ल़क्तरं ..

माझ्या सगळया स्वप्नांची,

ते एक उदध्वस्त शहर..

त्या शहराच्या गल्लीबोळात भटकत राहते..

एका नवीन अंकुराच्या शोधात..

जे कधी तरारेल,

फुलवेल पुन्हा त्या मरुभूमीला..

पण,

मला भेटतात फक्त शुष्क निवडूंग अन् काटेरी बाभळी..

ते एक उदध्वस्त शहर..

ज्यात राहतात फक्त अन् फक्त..

धुकट होत जाणार्‍या आठवणी,

तरीही..

तरीही..

अगदी निकराचा प्रयत्न करुन,

मी शोधू पहाते,

कुठेतरी नवजीवनाची चाहूल..

पण त्या शहरात मात्र सापडतात मला..

जळणार्‍या चिता..

माझ्याच सोनेरी स्वप्नांच्या..

त्या स्मशानभूमीत मी एकटीच उरलेली,

सगळं राख होत असताना पाहत राहते..

चिता जळतच राहतात..

त्या उदध्वस्त शहरात ..

माझ्या भग्न ह्रदयात ..

चिता जळतच राहतात...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: ते एक उदध्वस्त शहर...
« Reply #1 on: July 11, 2011, 02:34:44 PM »
छानच.....

Offline jayashri321

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
 • Gender: Female
 • माझ्या कविता..मझ्या ह्रदयातली स्पंदनं.
Re: ते एक उदध्वस्त शहर...
« Reply #2 on: July 18, 2011, 08:54:01 PM »
thnx dear.. :)

Offline chetant087

 • Newbie
 • *
 • Posts: 49
 • Gender: Male
  • माझा ब्लाग -
Re: ते एक उदध्वस्त शहर...
« Reply #3 on: July 19, 2011, 12:01:50 AM »
-- आता तो शहर सोढा आणि नवीन शोधा -- गेलेल्या गोष्टींची चिंता करुन काय फायदा नाही होत-- नवीन जीवन शोधण्यात हरवून द्यायचा स्वतः ला -- :)

-- nice one :) keep writing :) wish you all the best :)

Offline jayashri321

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
 • Gender: Female
 • माझ्या कविता..मझ्या ह्रदयातली स्पंदनं.
Re: ते एक उदध्वस्त शहर...
« Reply #4 on: July 19, 2011, 07:24:52 PM »
te shahar sodata yen kas shky aahe???
aathwni janbhar sobt kartat..
practically wichar kela tr it's true..ki life must go on..
pn kadhitri aathwn yetech na..

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: ते एक उदध्वस्त शहर...
« Reply #5 on: July 20, 2011, 10:16:44 AM »
nishabd..........

Offline jayashri321

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
 • Gender: Female
 • माझ्या कविता..मझ्या ह्रदयातली स्पंदनं.
Re: ते एक उदध्वस्त शहर...
« Reply #6 on: July 20, 2011, 06:51:43 PM »
nishbd....
hmmm...he shahar pn asch aahe..nishbd..
shwasancha sudha awaj hot nahi ithe..