कुणी नाही कुणासाठी,
तरी मग कश्यासाठी,
हि जोडायची नाती,
ह्या जोडायच्या गाठी,
क्षण दुराव्या नंतर,
आठवण राहे पाठी.
जर जायचेच दूर,
का मग गुंतवावा उर,
डोळी आसवांचा पूर,
काळजात हुरहूर,
तुझ्यावीणा सारे उणे,
वाटे सारे सुणे सुणे,
आता श्वासही धरतो,
प्राणास या वेठी.
दोन दिसांची वस्ती,
ना कुणी जन्माचे सोबती,
क्षण सुखाचे दुखाचे,
जिव्हाळ्याचे पाझरती,
कधी भरलेली मिठी,
कधी रिकाम्याच मुठी,
सुटे हातातून हात,
हि जगाची रहाटी.
दोन दिसांचा तंबू,
दोन दिसांचाच खेळ,
भिन्न प्रत्येकाची दोरी,
भिन्न प्रत्येकाची शिदोरी,
कधी उंच झोका घेणे,
उडी आगीमध्ये देणे,
या करमणुकीच्या खेळाला,
संसार नावाची पाटी.
.......अमोल