तिचं नशीबच वंगाळ
त्याला गरीबीच ठिगाळ
तिच्या लेकरांच आबाळ
कुनापायी
उनातानात राबली
तिला पदराची सावली
टाकली पोरं
आडोशाला उनापायी
खाई पाण्याबर भाकर
लेकरांच्या तोंडी चांगलं
कधी निजे उपाशी
पोरांपायी
पापणीला तिच्या
कधी पाणी नाही
नशिबाचा दुष्काळ
झाला बाई
जीव तिचा लेकरांवर
न पर्वा स्वतःची
नशीबान थट्टा केली
कश्यापायी,
बा असतो कणखर
माय असती प्रेमळ
कुणी सोडू नका त्यास्नी
मोहापायी
जन्म होईल ह्यो रिता
रीन आय बापाचं फेडता
देव तिनी जगाचा भिकारी
आई पायी
एवढंच मागणं माजं
परत घाल जन्माला
ह्या मायबा पोटी
प्रेमापायी .
मैत्रेय( अमोल कांबळे)