कितीही केले तरी विचारांचे काहूर मनात वाजल्यापासून राहत नाहीत.
मनाला समजावले कितीही तरी हळहळल्या पासून मन काही थांबत नाही.
धाकधूक जीवाची होत राहते मागील आठवणींची जाणीव झाल्यावर,
विचारात बुडतो मग असे का होत राहते आठवणीत बुडाल्यावर.
ते क्षण निघून गेले आहेत तरी पाठ सोडत नाहीत,
पुढील जीवांची साथ देत राहतात नवीन आठवणी जोपर्यंत निर्माण होत नाहीत.
करूणा भाकतो सदैव मी की विसरून जावे सगळे,
माझे दुख मीच जाणतो पण ते नव्हे जगा वेगळे.
उद्याचा विचार करत झोपी जातो सुंदर स्वप्नात पोहोचण्यासाठी,
पण त्याच आठवणी येत राहती स्वप्नातही रोजरोज भेटण्यासाठी...
रोजरोज भेटण्यासाठी.......