Author Topic: छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....  (Read 1774 times)

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
नको आम्हाला liberalization , privatization , globalization  ..................
छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....
ज्यात सुखाने जगण्याची नाहीतर नाही पण सुखाने मरण्याची तरी खात्री द्या.

अहो rocket  science , sapce  science ने कुणाचं भलं करताय.
रेल्व्येच्या गर्दीत जीव जातोय, सांगा त्याचं कधी बघताय.
अहो मंगळ, चंद्र या निर्जीव जीवरहित ग्रहांवर शोधताय तरी काय,
आमच्या धास्तावलेल्या आयुष्यावर काढा काही तरी उपाय.

metro  रेल्वेच्या नावावर आम्हालाच taxes  चा दंड,
आणि पहिल्या पावसात साध्या लोकलचेही signals  बंद.
नको हायफाय सुविधा, निदान साध्यातरी द्या,
छोट्याश्या ओंजळीत जीवन जगण्याची निदान खात्री द्या.

तुम्ही करा diplomacy ते करतायेत bomb  हल्ले,
तुम्ही ठोका भाषणे, इथे सामन्यांचे जीव चाल्ले.
वरून या डिवचायला स्पिरीट स्पिरीट म्हणून,
आम्ही आपलं जगायचं जीवाचा विट मानून.
आणि कसलं स्पिरीट कसलं काय,
अहो पोटासाठीच धावतायेत पाय.

मेल्यानंतर कश्यासाठी जगताना मदत जाहीर करा,
तुमच्या security  ला नाही police त्यांना लढायला माहीर करा.
महागाई, भ्रष्टाचार हे आता habitual  झालंय,
पण हे bomb वैगरे याची सवय नाहीये  आम्हाला,
नाही काही मोठी आशा पण संद्याकाळी पोहचू घरी जिवंत,
निदान याची तरी खात्री द्या.
छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....
ज्यात सुखाने जगण्याची नाहीतर नाही पण सुखाने मरण्याची तरी खात्री द्या.
 
.अमोल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....
« Reply #1 on: July 19, 2011, 11:41:38 AM »
apratim.......ekdam zakkas........too good......jabardast.....aahe hi kavita.....
Khup khup aawadali........
Agadi khare aahe he.......keep it up

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: छोटीशी ओंजळ आहे हो आमची.....
« Reply #2 on: July 21, 2011, 05:36:09 PM »
good one .........