कविता स्वप्नं रंगवणारी असावी
कविता सौंदर्यवर्णन करणारी असावी
कविता निसर्ग दाखवणारी असावी
कविता दुःख समजणारी असावी
कविता सुखावणारी असावी
वात्रटिका असावी
विनोदी असावी
विडंबन असावी
यमक जुळवणारी असावी
मुक्तछंद असावी
मग...
वास्तव दाखवणारी का नसावी .....
वास्तविकतेचही भान असणारी का नसावी .....
मर्यादा असली कि ती खुंडते
कविता खरं तर सर्वव्यापी असावी
छान संदेश ...