Author Topic: दूरवरून येणारे हुंदक्यांचे सूर  (Read 1171 times)

Offline संदेश प्रताप

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
  • Gender: Male
  • स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
    • Mazya kavita
दूरवरून येणारे हुंदक्यांचे सूर
अस्पष्ट होत गेले तेव्हा ...
तिरडी वरच्या
मुडद्याने
काळोख गच्च मिटून घेतला.
...आता
सावल्यांचे अनिर्बंध
अजस्त्र पाय,
स्वत:लाच तुडवत निघालेयत
स्मशानाच्या दिशेने ...

-श्याम प्रभू...

माझे मित्र श्याम प्रभू ह्यांची ही राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या कविता संग्रहातील ही एक कविता. दोन दिवसा पुर्वी त्यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांति लाभो ...संदेश