Author Topic: बाप माझा  (Read 2428 times)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
बाप माझा
« on: August 06, 2011, 03:51:41 PM »
सोसतो किती अपार,
साहतो किती भार,
झाला दुखाने बेजार,
बाप माझा.

आम्हा पोसणे हा धर्म,
कमावणे  हेच  कर्म,
जाणतो ना दुजे वर्म,
बाप माझा.

त्यास ना दसरा-दिवाळी,
करी स्वसुखाची होळी,
आणतो ऐश्वर्य वेळोवेळी,
बाप माझा.

ना मांडता ये शब्दात,
मुका भाव उरे हृदयात,
न बांधता ये कवितेत,
बाप माझा.
 
....अमोल

Marathi Kavita : मराठी कविता