तुझाविना मी काय??
तू नाही तर माझं अस्तित्व ते काय?
तुझ्या श्वासांशिवाय माझी स्पंदन ती काय?
तू नसलास ज्यांमध्ये,
अशी माझी स्व्प्न तरी काय??
नसेल तुझा सुगंध ज्या वाटांवरती..
त्या माझ्या आठवणींना अर्थच काय??
नाहीस सोबत तू तरी,
हे वारे,तारे,नद्या अन् सागर..
सगळ्यात तूच भरुन राहल्यासारखा वाटतोस..
श्वासांतून हरघडीला तूच आतबाहेर करत असतोस,
प्रत्येक अश्रूसोबत माझ्या पापण्यांशी ,
गालांशी तूच हितगूज करत असतोस,
माझ्या प्रत्येक हुंदक्यात ..
तुच दाटून येतोस...
माझ्या अबोली रात्रींना ,
तूच गडद करत जतोस..
आहेस कुठे तू?
कशी शोधू??
शेवटचे श्वास आता..
आता एकदा शेवटचच भेटू..
नाही दिसत कुठे तू मला..
जंग जंग पछाडल मी..
डोळे थकले माझे तरी..
तुझी एक चाहूल नाही..
अश्रू कोरडे झाले,
अन् हुंदके मूक झाले,
निशःब्द होण्या आता..
निशाच कुठे राहिली???
थकून शेवटी आता..
डोळे बंद केले मी,
मिटून घेतलं स्वतःला..
शेवटचचं..
अन् भेटलास मला,
माझ्याच श्वासांत्,अश्रूंत अन् हुंदक्यांत..
अन् घेऊन चालले आहे तुला सोबत..
तू जवळ नाहीस तर काय???
तुझा भास तर आहे...
----जयश्री पाटील..