तुझं येणं माझ्या आयुष्यात..
अगदीच अनपेक्षित्,अनिश्चित..
तुझ्या येण्याने,
माझ्या जीवनाच्या सीमा ..
कशा विस्तारल्यात हे कसं समजावू तुला???
अंतरंगात उमटणार्या संवेदनांची जाणीव कशी करुन देऊ??
तू येण्याआधीही मी जगत होतोच की..
माझ्या पद्ध्तीने,
स्वतःच्या मस्तीत ,धुंदीत.,बेफिकिरपणे.
तू आलीस पण..
तुझ्या डोळ्यातली वादळं पेलणं ,
मला कधीच शक्य झालं नाही,
मग मी असाच तडफडणारा..
तुझ्या मनाचा ठाव घेता घेता,
थकून जायचो अन् शेवटी..
तुझ्याच सावलीत विसावा घ्यायचो..
पण..
आता तू म्हणतेस..
तुला पाहिजे असणारी व्यक्ती मी नव्हेच..
कारण माझं जगण हे तुझ्या चाकोरीशी,
जुळणारं नव्हत कधीच..
असच होत तर..
का माझ्या भावनांना पंख देण्याच धाडस केलस तू??
तुझं माझ्यासाठी जीव तोडून कष्ट करण,
माझी चिंता वाहण,
अन् माझी वाट पाहणं..
सगळ क्षणिक होत??
फ्क्त एकदाच्,एकदाच तू मागे वळून पाहशील?
मी तिथेच उभा आहे..
जिथे पूर्वी होतो,
आयुष्य माझं थांबलेल नाहीये..
तुझ्याविना..
हे अगदी खरं..
पण त्यातले सूर मात्र हरवलेत..
ते गवसून देशील मला??
मी जसा आहे तसा स्वीकारशील मला?
तुझ्या मनात मला..
एका छोट्याश्या थेंबाएवढी जागा देशील?
पुन्हा एकदा मला सावरशील??
मला घेऊन ..
पंख देऊन ..
तुझ्या अवकाशात नेशील???