अण्णा
अण्णा तुमच्या उपोषणान केली कमाल
भारतभर आता गांधी टोपीची धमाल
अण्णा आगे बढो शब्दांना ढोल ब्यांडचा ताल
तुमचा इव्हेंट क्याश करून च्यानल मालामाल
तुमच्या उपोषणान सरकारचे केले हाल
तुम्ही एकटेच उपोषण कुठवर कराल ?
तुमच्या उपोषणाच गुपित आम्हाला सांगाल
अकरा दिवसाचं उपोषण कधी संपवाल?
सर्व उपाय वापरून त्यांची शिजली नाही डाळ
अण्णा सांगा कधी लिंबू पाणी प्याल ?
बीजेपीला मिळाली तुमच्या उपोषणाची ढाल
खरच किती जणांना थ्वूक आहे काय आहे जनपाल?
बेदी ,हेगडे ठीक पण कोण हे केजरीवाल ?
अण्णा अमच्यसाठी उपोषण संपवाल?
मंगेश कोचरेकर