आता नाही थांबणार मी
आता शांत नाही बसणार
क्रांतीची धगधगती मशाल
आता मी नाही विझू देणार
चव्हाट्यावर टांगलेली मानवतेची लक्तरं
आता नाही मी पाहू शकणार
माणुसकीच्या छाताडावर घातलेले घाव
आता नाही भरू शकणार
आता फक्त लढणार मी
आता संघर्ष होणार
काळजात भडकलेली आग
आता नाही विझणार
आता नाही थांबणार मी
आता शांत नाही बसणार
क्रांतीची धगधगती मशाल
आता मी नाही विझू देणार
- tsk007