(अण्णांच उपोषण नुकतच संपल. पण उपोषणा नंतर काही प्रश्न अनुत्तरीत राहिलेत. माझ्या मनात जे विचार आले ते लिहिले आहेत. ह्यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा अण्णांचा अनादर करण्याचा उद्देश नाही.)
तीनच आश्वासनांवर सोडून उपोषण,
खर सांगा अण्णा तुम्ही काय मिळवलत?
सक्षम लोकपाल आणण्या साठी
अण्णा आता एक करा
केजरीवाल बेदी कंपनीतून बाहेर या!
देशाला तुमची गरज आहे.
लोकपाल बद्दल लोकांच्या उंचावून अपेक्षा
खर सांगा अण्णा तुम्ही काय मिळवलत?
लोकांचे प्रभोदन करण्या साठी
अण्णा आता एक करा
लोकपाल म्हणजे काय ते लोकांना समजावा !
देशाला तुमची गरज आहे.
(लोकांनी रामलीला मैदानावर तिरंगा डोक्याला गुंडाळला कुणी अशोक चक्रामध्ये अण्णांचा फोटो लावला. त्यांच्या भावना जरी शुद्ध असल्या तरी हा तिरंग्याचा अपमान आहे.)
रामलीलेवर देऊन तिरंगा लोकांच्या हाती
खर सांगा अण्णा तुम्ही काय मिळवलत?
तिरंग्याचा मान राखण्या साठी
अण्णा आता एक करा
लोकांना एक दिवस उपोषणाला बसवा !
देशाला तुमची गरज आहे.
मंत्र्यांना अन सरकारला भ्रष्ट ठरवून
खर सांगा अण्णा तुम्ही काय मिळवलत?
भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्या साठी
अण्णा आता एक करा
स्वतःचा राजकीय पक्ष काढून सरकार बनवा !
देशाला तुमची गरज आहे.
स्वछ देशाच्या मागणी साठी उपोषण करून
खर सांगा अण्णा तुम्ही काय मिळवलत?
देश स्वछ करण्या साठी
अण्णा आता एक करा
गावो गावी राळेगण राबवा !
देशाला तुमची गरज आहे.
कसाब खातो बिर्याणी, रामलीलेवर तुम्ही उपाशी.
खर सांगा अण्णा तुम्ही काय मिळवलत?
देशाचा दबदबा जगात उंचावण्या साठी
अण्णा आता एक करा
कसाबला फाशी देईस्तोवर उपोषण करवा !
देशाला तुमची गरज आहे.
माझ लिहिण जर टीका वाटत असेल
तर अण्णा आता एक करा
मला देश द्रोही ठरवून
कसाब शेजारी बसवा
देशाला माझी गरज नाहीये.
केदार....