वादळात उडणारा एक मातीचा कण मी...
दुर्जनांच्या शरीरातील मन मी...
दर्याच्या पोटातला एक तुषार मी...
मुर्खांसमोर मन डोलावणारा हुशार मी...
मढ्याच्या टाळूवरच लोणी खाणारा परजीव मी...
जन्माला आलेला एक निर्जीव मी...
अन्यायाला हसत हसत पचवणारा षंड मी...
ज्वालामुखीच्या उद्रेकातही थंड मी...
माणुसकीच्या नावाला कलंक मी...
लक्ष्मिसाठी स्वतःला विकणारा रंक मी...
मानवाच्या अस्तित्वाची येणारी कीव मी...
पण पोकळ विचारांनी भरीव मी...
भ्रष्टाचार विरोधासाठी सदैव तयार मी...
मात्र स्वार्थापोटी गानिमाचाही यार मी...
नेत्यांच्या क्रूर चेष्टेचा साक्षीदार मी...
पण या परिस्थितीला एक जबाबदार मी...
मशाल घेऊन पावसाशी टक्कर घेऊ पाहणारा मी...
पण पेटवण्या आधीच तीच मशाल विजवणारा मी...
आक्रोशाने मावळ्यांना एकजूट करू पाहणारा मी...
पण मावळाच असल्याने शिवरायांची वाट पाहणारा मी...
स्वतःच स्वतःचा अभ्यास करून बघा तुम्हीही...
नरकाच्या रांगेत माझ्या मागे उभे असाल तुम्हीही...
...संकेत शिंदे...