महागाई वाढते दर दिवशी, सर्वांचेच कंबरडे मोडी...
तुम्ही आम्ही करू शकू ना काही, गप्प सोडवा कोडी
पेट्रोल वाढले, डीझेल वाढेल वाढतील सर्वांच्याच किमती
खर्च होतच राहणार, लक्ष केंद्रित करा आमदनिवरती
जगून घ्या मन भरून, अजून कर नाही जीवनावर
तो दिवस दूर नाही जेव्हा पाऊल ठेवण्यास जागा नसेल धरतीवर
भविष्याची चिंता सर्वांनाच आहे, पण हा काळ आहे "आज" जगण्याचा
जीवन खूप सुंदर आहे, एखाद्यालाच मिळतो आनंद ते उपभोगण्याचा
पैसा म्हणजे सर्वस्व नाही आणि संपत्ती म्हणजे सुख नाही
यमासमोर सर्वच लाचार, तो मात्र कोणाचाच वशिला घेत नाही
संपताना आयुष्य तुमच, जीवन तुमच तुमच्याच डोळ्यासमोरून धावेल
खूप काही केल असाल पण "जगायचं" मात्र राहून गेल अस वाटेल...
डोळे एकदाच मिटले जातात परत कधीही न उघडण्यासाठी
विचार करा तुमच्याच जीवनाचा, उद्या नाही.... "आज" जगण्यासाठी
...संकेत शिंदे...