भिकारी
ऐसे दिवस पण
पहावयासी ठेवले जगी
आज झाहलो भिकारी
आपुल्याच दारी
पोटच्या गोळाला वाढविला
आकार दिला
तो ची आज विकार ठरिला
रचिले स्वप्न सुखांचे
दुखात सर्व विरले
कर्तव्य जाणूनी केले
ते फोल ठरिले
रस्त्याच्या कडेला बसूनी
आसवांच्या आड दिसती
पोरं बोटं धरूनी चालती
-- काव्यमन