पाषाण ह्रद्यी तुझ्या पाझर फुटावे
माय ठेवूनी गेली दारी,
सांभाळ माझा दुसराच करी
नाही जवळ कोणी रक्ताची नाती
मी एकला या भू-तलावरती
नाही बहीण, नाही भाऊ
माझे मन मलाच खाऊ
एकट्याने खावे, एकट्याने रमावे
नाही मायेचा हात मुखी माझ्या भरवावे
दुखी कष्टी होता,
आपूणच आपली आसवे पूसावे,
ऐकावी हाक माझी माय,
पाषाण ह्रद्यी तुझ्या पाझर फुटावे
-काव्यमन