Author Topic: बाहुली  (Read 1500 times)

Offline nishpap

  • Newbie
  • *
  • Posts: 1
बाहुली
« on: October 15, 2011, 06:07:12 PM »

आमच्या बाहुलीची शाळा संपली,
आता तिची तिच्या घराकडे वाटचाल !
किती तोला मोलाने, हौसे मौजे ने,
नाचली बागडली होती आमची बाहुली शाळेत !
तिचा या पुढला रस्ताही तसा
निसरडा नाही म्हणा तिच्यासाठी !
कांहीही बोलू नका आमच्या बाहुलीला कधी !
जितकी पानं खरडून – खरडून प्रश्न मांडेल आमची बाहूली तुमच्या समोर,
तितकीच पानं भरून, चिमणीची गोष्ट तुम्ही तिला सांगत रहा !
तिची मामी, शाळेत मुलांना सांगते तशी !
चिमणीच्या गोष्टी तिला कधीही येऊ देऊ नका !
आपल्या बाहुलीची कविता लिहिता – लिहिता कां गळा दाटून येतो ?
एकाच वेळी कां आठवण येते, बाहुलीची नि बाहुलिच्या आईची !
हक्काच्या घरात बाहुली पोचल्यावर काय उरणार असेल मागे,
बाहुलीच्या आईच्या घरात !
बिन बुडाचं रिकाम पण ?
की वाईट खोड जडलेली हवा
जी फर्शावर पडलेले, आठवणींचे चिटोरे सुद्धा
एका झोक्या सरशी पळवून नेते !
कोणास ठाऊक कधी पासून चाललं आहे हे
घरी पोचलेल्यांनी आतून दारं बंद करायची
नि बाहेर राहणा-यांनी कडी वाजवायची !
आमची बाहुली आपल्या घरी पोचल्यावर,
असंच दार लावून घेईल
त्यानंतर काय उरेल आमचं, आमच्या बाहुलीत ?
पण हिशोबाच्या जुन्या पुराण्या, धूळ खात पडलेल्या वह्यांना सुद्धा
कधी-कधी कड्या वाजवता येतात !
आमच्या बाहुलीची शाळा संपली
आता तिची तिच्या घराकडे वाटचाल !   

अरुण शिरढोणकर (माझे वडील - त्यांची कविता )
« Last Edit: October 15, 2011, 06:10:15 PM by nishpap »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):