...तर हो मी गुन्हेगार आहे
मी प्रत्येक वेळी इतरांचा विचार करत होतो जेव्हा
खूप मजेत सगळं चाललं होतं तेव्हा
आज स्वतःचा विचार केला म्हणून जर शिक्षा मिळत असेल
...तर हो मी गुन्हेगार आहे
प्रेमात काही मागू नये म्हणतात
म्हणून फक्त देतच होतो दिवस-रात
सर्व काही गमावून बसलो असं वाटत असताना
आज फक्त थोडी अस्मिता मागितली म्हणून एकटच रहावं लागणार असेल
...तर हो मी गुन्हेगार आहे
प्रश्न काही पडला तर उत्तर माझ्याकडेच मिळायचं
सर्वांच्या दुःखात त्यांनी मलाच नेहमी आठवायचं
सतत इतरांच्या चुकांना सावरत असताना
आज मी चूकलो म्हणून आभाळ कोसळत असेल
...तर हो मी गुन्हेगार आहे
हृदयावर वार होताना ही मी शांतच बसलो होतो
त्याला टाहो फोडायचा असताना ही मी तोंड उघडत नव्हतो
अजूनही मी अबोल आहे म्हणून त्याची कोणी किंमतच ठेवणार नसेल
...तर हो मी गुन्हेगार आहे
किरण गोकुळ कुंजीर