सांग ना ग आई आजकाल अस का होत नाही..
आजही चुका होतात माझ्या हातून,
"होते रे बाळा चुक माणसाच्या हातून" ऐवढ वाक्य पुरे असायचं मन समजवायला,
आजकाल तासभर समजावूनही मन समजत नाही,
सांग ना ग आई आजकाल अस का होत नाही....
ऐसी आहे बोईलर आहे,
पण तुझ्या कुस सारखी ऊब आणि शांत झोप येत नाही,
डोळे झोपतात पण डोक्याला मात्र झोप येत नाही,
सांग ना ग आई आजकाल अस का होत नाही....
हव ते खाऊ शकतो,
पण तु राखुन ठेवलेल्या खाऊ खाण्यासारख समाधान त्यात मिळत नाही,
पोट भरत पण मन भरत नाही,
सांग ना ग आई आजकाल अस का होत नाही....
जगातील सर्वात शूर व्यक्ती होते बाबा माझ्यासाठी,
असताना सोबत ते भीती दूर पळून जायची,
घराला कुंपण आणि दाराला ४ काळ्या लावूनही,
आजकाल मनातली भीती जात नाही,
सांग ना ग आई आजकाल अस का होत नाही....
बाबा रागावले, भाऊ ने माझा पेन घेतला
म्हणून मन दुखावून तुझ्याजवळ मुसुमुसु रडायचो,
आज मन कमी दुखावतो आणि मनस्ताप जास्त होतो,
हृदय हंबरडा फोडून रडत,
पण डोळ्यात मात्र पाणी येत नाही,
सांग ना ग आई आजकाल अस का होत नाही....
रवि वारके....