बाजी प्रभू देशपांडे यांची पावनखिंडीतली लढाई... त्याचे वर्णन कादाचीतच शब्दांत होऊ शकेल. कुसुमाग्रजांची "सरणार कधी रण" वाचली अन प्रयत्न केला, पामराने तेजाचे वर्णन करण्याचा..
पाय रोवुनी उभा ठाकलो
मनी न आता तमा कुणाची
मर्द मराठा मावळा मी
नोहे साधारण सैनिक कुणी
राजं... सुखरूप जा गडावरी
उभा राहिलो घोड खिंडी
शत्रुसैन्याचा काळ बनुनी
पावन ती खिंड जाहली
मर्द मराठी वेड पाहुनी
राजं... सुखरूप जा गडावरी
रक्त पिउनी प्यासी अजुनी
दांडपट्ट्यांची पाती
कितेक शिरं कापुनी काढली
सामोरी पडती लाशींच्या राशी
राजं... सुखरूप जा गडावरी
अनेक जाहले घाव वर्मी
केली देहाची चाळण पुरती
महामेरुसम निश्चय मनी
न शीणली जिद्द अजुनी
राजं... सुखरूप जा गडावरी
प्राण एकवटले सारे कानी
अजून न मिळे तोफांची वर्दी
गळुनी पडले खड्ग हातुनी
राजं.. नाही हरला तुमचा बाजी
सुखरूप जा तुम्ही गडावरी
शेवटाकडे आली लढाई
देहातुनी चालले प्राण सुटुनी
उजाडेल नवा सूर्य स्वराज्यी
मालवून आमची प्राणज्योती
राजं... सुखरूप जा गडावरी
मिथिल शिंदे..