Author Topic: वेडे...  (Read 1565 times)

Offline shindemithil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Male
वेडे...
« on: November 16, 2011, 09:05:45 PM »
आपल्या (अ)प्रिय राजकारण्यांस समर्पीत...

वेड्यांच्या या दुनियेमध्ये, मीच एकटा शहाणा
छाती ठोकून सांगतो आहे
वेड्यांचाच एक नेता

वेड्यांच्या या बाजारामध्ये, शहाण्यांना नाही थारा
असे ज्याचे आहे म्हणणे
तोच ठरतोय वेड्यांचा राजा

काही वेडे हुशार भारी, शहाणपणाच्या शपथा घेती
शहाणपणाच्या मुकुटाखाली
वेड्यांचीच डोकी चालती

एक वेडा उठून म्हणतो, भ्रष्टाचार्यांना हाकलून द्या
गर्दीतून आवाज येतो
याला पहिली लाथ घाला

गांधीवादी वेडे म्हणती, अहिंसेचा मार्ग भारी
सिद्ध कराया कमी न पडती
तळपत्या तलवारींची पाती

रामानुयायी वेडे काही, 'श्री राम, जय राम' जप करती
आचरणात मात्र भली विसंगती
मंदिरासाठी किती राम कापती

शिव्या घालाव्या तरी कुणाला? आणि किती?
खुर्चीवर बसणारा कोण असतो
तुमच्या आमच्यातलाच कुणीतरी

आपलेच दात, आपलेच ओठ कशी करावी बोलणी
एकातही हिम्मत नाही
आपल्याच दातांनी...
आपलेच ओठ फोडण्याची...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: वेडे...
« Reply #1 on: November 17, 2011, 01:10:16 PM »
एकातही हिम्मत नाही
आपल्याच दातांनी...
आपलेच ओठ फोडण्याची...khr ahe

Offline shindemithil

 • Newbie
 • *
 • Posts: 19
 • Gender: Male
Re: वेडे...
« Reply #2 on: November 19, 2011, 12:08:31 PM »
hmmmm....