काय करावी तिची व्याख्या
वाढतच चालली लोकसंख्या,
बेरोजगारी, उपासमारी अन गुन्हेगारी
वाढतच चालल्या समस्या डझनवारी ...
लोक्संख्याच्या भूतान झपाटलं
असं, महागाई अन भ्रष्ट्राचाराच म्हण पटलं,
देशाची आर्थिक परिस्थिती चालली ढासळत,
प्रत्येक पदार्थात भेसळ अन मिलावट...
दारिद्र्य, गरिबी वाढतच गेली,
काही मुलं उपोषणाने तर काही कुपोषणाने मेली,
रडरडून सुकून गेली आसवे,
जीवनानेच झाले आहे हसावे...
प्रत्येक कारणाला एकचं कारण,
त्यात भ्रष्ट्राचारी न नेतागिरी सारण,
लोकसंख्या वाढली अन सुखाचे झाले हरण,
येथे जन्मलो आणि येथेच येणार मरण...
संध्या पगारे