एकदा जात असतांना, वाटेने एका निर्जन रस्त्यावर दिसली ति बसली होती काहिस सुकलेल फूल घेऊन हाती.
एखाद्या खोलवर गेलेल्या विहिरीसारखे तिचे डोळे, खोलवर गेलेले तिचे अश्रू तर कधिच सुकले होते, अस वाटत होत कि वर्षानूवर्ष पाहत असावी कोणाची तरी वाट,
कारण तिचे लक्ष लागलेले होते त्या निर्जन रस्त्याकडे,
तो येईल याची उमेद तिची काहि संपत नव्हती.
तो येण्याची आस अजून मिटली नव्हती. तिच्या प्रेमाचे गित तो उनाड वाराही गात होता. कोण होता तो जो तिला सोडून गेला होता. तिच्या डोळ्यातले सारेच स्वप्न तोडून गेला होता. या माणसांच्या गर्दित तिला एकट सोडून गेला होता, कोणा तरि एकाला विचारले असता समजले. तो तर तिच्यासाठी सारे जगच सोडून गेला होता. तरी देखील ति वाट पाहत होती त्याची, आणि पूढेहि अशीच पाहत राहणार, आणि अशीच बसून राहणार त्या निर्जन रस्त्यावर.... ! तो येईल असा विचार करत.
-गौरव कणसे