एवढी लोकं दिसतात तरी एकटं एकटं वाटतं
college आधार कुठे तरी तुटल्यासारखा वाटतो
गर्दीमध्ये हात माझा सुटल्यासारखा वाटतो
मायेचं पांघरून कुणी ओढल्यासारखं वाटतं
हीच का ती दुनिया, कळून चुकल्यासारखं वाटतं
आजपर्यंतची समीकरणे मोडल्यासारखा वाटतं
कसल्यातरी स्पर्धेत भाग घेतल्यासारखा वाटतं
तरी तिथे धावताना कुणी ढोसल्यासारखा वाटतं
रात्रीसुद्धा झोपताना काही राहिल्यासारखा वाटतं
झोपेतून उठताना थोडं मेल्यासारखा वाटतं
कधी कधी वाटतं.. जरा दाखवून यावं कुणाला
हे एवढं सगळं वाटतं.. सांगून यावा कुणाला
नंतर त्यालाच शोधत बसु दे, मला एवढं का वाटतं
- रोहित