रोजची धावपळ, रोजचीच मरमर
मनातले वादळ थांबत नाही
दिवसांमागून वर्षे सरली
इथला संघर्ष काही थांबत नाही
जगण्यासाठी लागतेच काय
दोन वेळची भ्रांत... अजून काही लागत नाही
किनार्यावर असावे इवलेसे झोपडे
मी जास्त काही मागत नाही
झाडांच्या गर्दीत हरवून जावे
पाखरांच्या गीतात सामील व्हावे
सुंदर आयुष्याची व्याख्या काय
माझी मलाच उमगत नाही
क्षणात हसणे उगाच रडणे
आयुष्य एवढं उथळ काय
गेले दिवस इथपर्यंतचे
इथून पुढचे असेच काय
दुपार सरते, रात्र टळते
दिवस इथला संपत नाही
मनात उरल्या पाऊलवाटा
पाऊल काही सरकत नाही
बरेच उरले आयुष्य बाकी
बरेच उरले करणे बाकी
आला दिवस जाण्यासाठीच
अश्या जगण्या अर्थ नाही
दिवसांमागून वर्षे सरली
इथला संघर्ष काही थांबत नाही
इथला संघर्ष काही थांबत नाही.....
- रोहित