Author Topic: लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..  (Read 1742 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून  गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
....
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी
लावायचा  तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
पुसले  डोळे.. हसून खोटे
चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे  आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
हसून  आता.. विसरून सारे
वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून  गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून  गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.