काल देव मला स्वप्नात भेटला
माग हवे ते मला म्हणाला
मी बोलली नको काही मला
दिलेस तेच खूप आहे
दुक्खांची जखम अजून ओली आहे
जे हवे ते नाही दिलेस
नको ते पदरात टाकलेस
सुख एक तर दुक्ख १०० दिलेस
तरीही जगते आहे कारण हे
जीवन पण तूच मला दिलेस,
असंख्य लोक आहेत जगात
मीच का रे दिसते तुला पाण्यात
नशिबाशी खेळताना माझ्या
विचार नाही आला का तुझ्या मनात
देव म्हणाला असे नही बाळा
समजून तरी घे मला
मी तुला सुख पण दिले
पण तूला नाही ते दिसले
नको त्याच्या मागे धावली
होते तेही गमावून बसली
जे तूला हवे होते
ते तुझे कधी नव्हते
अवर घाल स्वतःच्या मनाला
मान्य कर आहे त्या परिस्थितीला
कसे अवर घालू माझ्या मनाला
आठवणी त्याच्या सतावतात मला
अजूनही मनाला आस आहे
त्याचा येण्याचा ध्यास आहे
अरे देवा आता तरी थांबव
हा सावल्यांचा खेळ
करून दे पुन्हा
आमचा मेळ
जे हाताच्या रेषेत नाही
ते मी तुला देऊ शकत नाही
तुज आहे तुझ पाशी
नको घेऊ झेप आकाशी
हे जग खूप सुंदर आहे
एकदा तू जागून बघ
खूप मागितलेस दुसर्यांसाठी
स्वतहासाठी पण थोडे मागून बघ
आभार मानले देवाचे
सोडले दार दुखाचे
कवटाळले क्षण सुखाचे
(कल्पना शिंदे(mona) -२०.१२.2011)