ई-व्यसनाचा विळखा..
व्यसनी आला...व्यसनी आला
काश्या दवंडी पेटवत सुटला
नुकत्याच निजलेल्या राजाचा
श्वासच अडकून बसला......
दारूबंदी केली, गुटखाबंदी केली
न जाने माशी आता कोठे शिंकली
विचार करता करता राजा म्हणाला
आता माझी सटकली......
राम्याला सांगावा धाडला
गण्याला निरोप दिला
बाळ्याला तर Call च केला
पण तरी नाय राजाला ठाव कुणाचा मिळाला.....
भेदरलेल्या राजाने बिरबलाचा धावा केला
चाणाक्ष त्या माणसाने Facebook Account Open केला
राम्या,गण्या,बाळ्याने लगेच Status Update केला
राजा आला......राजा आला........
राजाची Tube लगेच पेटली
नवीन व्यसनांची चाहूल त्याला लागली
Internet चे फायदे सांगणाऱ्या राजाला
तोटयाचीही लगेच जाणीव झाली......
कुस्ती मातीत गेली, हॉकी हवेत विरली
जनता फक्त Computer वर Game खेळू लागली
Internet चा वापर चांगल्या कामाकरिता सोडून
जनता दुरुपयोग करण्यात तहानभूक विसरून गेली.......
पोरांच्या करिअरची आणि अभ्यासाची वाट लागली
शेती वाऱ्यावर गेली आणि संस्कृती-नितीमत्ता धाब्यावर बसवली
कामाची भावना लोप पावली आणि पाश्च्यात संस्कृती बोकांद्यावर बसली..
राजा लगेच जागा झाला
Internet च्या दुष्परिणामांचे धडे देवू लागला
प्रजा लवकर सुधारावी यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागला .........
अमित सतीश उंडे....