बिहारींना होतोय बिहारचा भास
सरदारांनी घेतलाय पंजाबचा ध्यास
मराठ्यांनी धरलीय महाराष्ट्राची कास
कोंडतोय यात एका भारतीयाचा श्वास ............
आजोबांनी लढली स्वातंत्र्याची लढाई
बाबांनी लढली धर्माची लढाई
आपण लढतोय प्रांताची लढाई
मुले लढतील त्यांच्या भागाची लढाई..........
शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबेना
महागाईचा फुगा आटोक्यात येईना
अन्यायाविरुद्ध कोणी संघर्षही करेना
प्रांताच्या नावाखाली एकमेकांचा जीव काही सोडेना..........
दहशतीचा काळ काही केल्या थांबेना
सीमाही आता सुरक्षित वाटेना
विदेशी कंपन्यांची मक्तेदारी मोडेना
तरीसुद्धा आपण प्रांत काही सोडेना...........
सगळ आता कळतया
पण मन मात्र वळेना
विचार आपला बदलतोया
पण कृती मात्र होईना........
बदलूया आणि सुधारुया
योग्य आचरण आणि कृती करूया
देशाला विघटनापासून वाचवूया..........
अमित सतीश उंडे.......