लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा, पन्हाळा
बघतोय तिकड धूरच काळा
कुठ कुठ जायाच हवा खायला.........राया ...........
कुठ कुठ जायाच हवा खायला................
गाडी पैसा आहे आमच्या दिमतीला
मस्तानी बाजीरावाची परंपरा सांगायला
CO2- NO2 आहेत आता सोबतीला
O2 चाही लागलाय श्वास आता कोंडायला
कुठ कुठ जायाच हवा खायला..........राया.........
कुठ कुठ जायाच हवा खायला..........
झाडे लावा-झाडे जगवा शाळेत आपण शिकलोया
प्रगतीच्या नावाखाली अक्कल गहाण टाकलीया
उद्योग सगळे करताना जंगले आपण तोडलीया
पिढीसाठी पुढच्या किमान O2 तरी सोडूया
कुठ कुठ जायाच हवा खायला.........राया..........
कुठ कुठ जायाच हवा खायला..........
काहीतरी विचार हवा आता करायला
होता का हो पुढ तुम्ही, सर्व हे थांबवायला
नाहीतर बसतील चटके हो सर्वाला
तवा येईल अक्कल हो, आपल्या बाजीरावाला .....
कुठ कुठ जायाच हवा खायला.........वो........
कुठ कुठ जायाच हवा खायला..........
अमित सतीश उंडे.......