Author Topic: समस्या महाराष्ट्राच्या........  (Read 1220 times)

Offline amitunde

 • Newbie
 • *
 • Posts: 33
मित्रानो आपण नेहमीच म्हणतो कि ....
फक्त गर्वच नाही तर माज आहे मला मराठी असल्याचा ...
पण कळेल का हो ....नक्की कसला माज आहे आपल्याला ....

देशात सर्वात जास्त महाराष्ट्रातील लोक आत्महत्या करतात याचा माज आहे कि
... सुरेश कलमाडी , अशोक चव्हाण महाराष्ट्राचे याचा माज आहे ....

विदर्भातील शेतकरी मरत असताना पश्चिम महाराष्ट्रात उस दर जास्त दिला जातोय याचा माज आहे कि
पट पडताळणीत २०००० हून अधिक शाळा बोगस निघाल्या याचा माज आहे ...

स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात महाराष्ट्र आघाडीवर आहे याचा माज आहे कि
परराज्यातून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्त्यांवर हल्ला करतो याचा माज आहे ....

गडचिरोलीतील नक्षलवाद संपवू शकलो नाही याचा माज आहे कि
नंदुरबारमध्ये आजही कुपोषणाने बालके मरतात याचा माज आहे ....

गणपतीत नको तसे नाचून संस्कृती हरवून बसवून याचा माज आहे कि
दहावी पर्यंतच्या शिक्षणाला काहीच किमत राहिली नाही याचा माज आहे ...

कोकणवासियांना नको असताना जैतापूर प्रकल्प त्यांच्यावर लाद्तोय याचा माज आहे कि
चांगले प्रोजेक्ट महाराष्ट्राला BYE BYE करून गुजरातमध्ये चाललेत याचे माज आहे ...

राज्यकर्ते हे सर्व उघडपणे करतात याचा माज आहे कि
आपण निमुटपणे सहन करतोय याचा माज आहे.....

अमित सतीश उंडे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
hummmm... tumcha likhan khup changal ahe .... dolyan anjan ghalanar ... keep writing ...