Author Topic: ३१ डिसेंबरला अजून काय करायचे..........  (Read 1720 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
दारू प्यायचे, DRUGS घ्यायचे
विक्षिप्तपणे कसेही नाचायचे
नैतिकतेचे अधपतन करायचे
स्वताची ओळख स्वताच विसरायचे
३१ डिसेंबरला अजून काय करायचे..........

नवीन नवीन चांगले संकल्प सोडायचे
पूर्तता करणे मात्र देवावर सोडायचे
नाचणाऱ्या बायकांवर पैशे उधळायचे
शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे फक्त तोंडानेच गायचे
३१ डिसेंबरला अजून काय करायचे..........

शाकाहारी राहण्याचा संदेश जगाला द्यायचे
स्वत मात्र प्राण्यांची मिसळ करून खायचे
विधायक कार्य करण्याचे विचार गंगेत सोडून द्यायचे
गरिबांना मदत तर कधीच नाय करायचे
३१ डिसेंबरला अजून काय करायचे..........

संस्कृती, सभ्यता यांना स्पर्शही नाही करायचे
स्वताला पांढरपेशा समजायचे
मोठ्या बात मारून दुसऱ्याला उपदेश द्यायचे
आपले वर्तन मात्र कधी नाही सुधारायचे
३१ डिसेंबरला अजून काय करायचे..........

मित्रानो, ३१ डिसेंबरला व्यसनाच्या आहारी न जाता तसेच पैशाची होणारी उधळपट्टी थांबवून आपण अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ देवू शकतो, वृधास्रमातील लोकांना फळे वाटप करू शकता,सामाजिक संस्थाना देणगी देवू शकता,ग्रंथालयांना पुस्तके देवू शकता कि दुष्काळी भागातील जनावरांना चार देवू शकता....आपल्या अशा वागण्याने कोणाचे आयुष्य जरी बदलणार नसले तरी त्यांना जगण्याची प्रेरणा मात्र नक्की मिळेल.....विचार करा.....

अमित सतीश उंडे 
« Last Edit: December 28, 2011, 09:35:40 PM by MK ADMIN »