Author Topic: आता तरी देवा पाऊस पाड  (Read 1359 times)

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
आता तरी देवा पाऊस पाड
« on: January 03, 2012, 10:37:01 PM »
आता तरि देवा पाउस पाड..................................
आता तरी देवा पाऊस पाड...
 अरे कोरड पडलय जमीनितल आड न आड
 वाळुन गेलय शेतातल काड न काड.......
अन जळुन गेलय र रानातल झाड...न...झाड..
आता तरी देवा पऊस पाड..................

अरे मानसा साठी नकोरे बाबा जनावरा साठी पाड
अन पुरव तुझ्या गुर ढोर लेकरान्चा लाड
अर वाटल तर मला जमीनीत गाड..
पण मया लेकरासाठी तर पानी धाड
अन आता तरी देवा पाऊस पाड........

अर सरड्या सारखे बसलेत रे हे ’लोक’ ढोन्ग करुन
आणि गेलेत रे ते तुझ्या शक्तिला विसरुन
अर भोन्गळे केले रे त्यान्नी...... अम्हाला लुटुन
अनि खोटी पानी देन्याचि आश्वासने देवुन.......
अर अता तरी तुझ्या जटातल्या गन्गा माईला जमीनीवर धाड
अन मोडुन काढ यान्च्या जिभितल हाड........
अन आता तरी देवा पाऊस पाड..........

नटली होति ती, पन आज झालिया ऊजाड
अन उघड पडलय तिच्यावरच पहाड न पहाड....
जशी केशव बनुन तुच राखलिस द्रौपदि ची लाज
तशिच देवा तुझि गरज आहे आज
राम बनुन पाठिवरला धनुश्य काढ
अन विशाल गर्जनारया  ढ्गाना पाड
अन आता तरी देवा पऊस पाड.................

कवी: बळीराम भोसले

Marathi Kavita : मराठी कविता


Sac

 • Guest
Re: आता तरी देवा पाऊस पाड
« Reply #1 on: January 05, 2012, 07:15:01 PM »
mast ahe re kavita

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आता तरी देवा पाऊस पाड
« Reply #2 on: January 06, 2012, 12:27:48 PM »
aprtim....... khrach aprtim

Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: आता तरी देवा पाऊस पाड
« Reply #3 on: January 06, 2012, 04:09:44 PM »
dhanyawaad........!!! hi kavita mi adich warsh khali banwili hoti jenva pawus padat navhta..kon janya kaskay tyach warshi khup pawus jhala........