Author Topic: फ़क़्त , एकदाच करा विचार .............  (Read 2331 times)

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
फ़क़्त , एकदाच करा विचार .............

वाचली एक बातमी ,
पेपरात होती छापून  आलेली
तुम्ही हि वाचली असेल ,
बातमी भयानक ती ,
होती ती बातमी ,
हत्या १९ स्त्री भृणानची

वाचता ती बातमी , रागाने तप्त झाले मी
चर्र झाले मनात आणि काही वेळ निःशब्द झाले मी
मग विचार आला मनात , त्या निष्पाप जीवांचा
काय गुन्हा होता त्यांचा , एवढाच ना .....की
त्या जीवांनी घेतला होता , जन्म ..... स्त्री चा 
 
कुठला जन्म कोणाला मिळणार
हे नसते आपल्या हातात
जो जन्म मिळेल त्यात
मानायचे असते समाधान

ज्यांच्या गर्भात होते हे जीव
आहेत त्या सुधा एक स्त्री 
मग का विसरल्या त्या
देवाने दिलेली देणगी ही

स्त्रियाच त्यांच्या मातृत्वाचा
करत नाहीत आदर
म्हणून ओढवते त्यांच्यावर
गर्भ पाडण्याची परिस्थिती वरचे वर

हा संदेश आहे , प्रत्येक स्त्री साठी
कुठलाही विचार करा जरा , गर्भ वाढवण्याच्या आधी
जेंव्हा वाढू लागतो गर्भात , जीव नवीन तेंव्हा
अधिकार नसतो तुम्हाला , गर्भ चाचणी करायचा

असो मुलगा वा मुलगी , ते असते तुमचे संतान

संतान कोणतेही असो , असो मुलगा वा मुलगी
करणार नाही भेदभाव , देवू आम्ही चांगले संस्कार
असे हवेत तुमचे विचार , किंबहुना हेच हवेत तुमचे विचार

अंगी बाणाल जेंव्हा विचार चांगले
तेंव्हाच सौख्य , मांगल्य तुमच्या दारी नांदले   

फ़क़्त , एकदाच करा विचार ................

!!!!!!!!! विशाखा बेके !!!!!!!!! 

Marathi Kavita : मराठी कविता


Miriyalkar Manoj

 • Guest
Very nice, Stree hatya India madhe Gunha ahe! Friends Jar Female nasel tar Male Kuthun yenar......... Female he Devi aste he tumhi kadhihe visaru naka! Take care!

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
dhanyavaad  sir

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
khup chan kavita....

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
dhanyavaad  sir 

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
very nice poem ........................

Offline vishakha beke

 • Newbie
 • *
 • Posts: 32
thnx  jyoti

Offline vickyjadhav

 • Newbie
 • *
 • Posts: 9
aprtim