Author Topic: कन्येची संसार सुख लाभो......  (Read 1105 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
बालविवाह प्रतिबंध....काळाची गरज......

कन्येची संसार सुख लाभो
माता-पित्यांची आशा...

कन्या १८ची नाही अजूनही
लग्नाची घाई कशाला...

शिक्षण तिचे पूर्ण होऊ दे
मदत होईल उज्वल भविष्याला...

कन्या म्हणजे जबाबदारीचे ओझे नव्हे
या खांद्यावरून त्या खांद्यावर टाकायला ...

कन्या विचाराने परिपूर्ण झाली तरच
संसाराचा गाडा लागेल सुरळीत चालायला ...

लहान वयात अपत्ये झाली तर
त्रास होईल माता व बालकाला...

कर्तव्य व जबाबदारीचे ओझे समर्थपणे पेलायला
कन्येला हवीत १८ पूर्ण व्हायला...

कन्येचे खरे सुख कशात
याचा विचार हवा आता करायला...

सुरुवात करू स्वतापासून
मग लागेल समाजही बदलायला ...

कन्येला देऊया चांगले शिक्षण व सर्व सुविधा
प्रोत्साहन देऊया तिच्या विचारांना व कलेला
हातभार लावूया प्रगत भारताच्या विकासाला.....

Amit Satish Unde...Sangli...

« Last Edit: February 15, 2012, 09:10:50 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: कन्येची संसार सुख लाभो......
« Reply #1 on: February 08, 2012, 11:21:29 AM »
brobbar sangitlay...