Author Topic: माऊले, तूच त्यांचा आधार........  (Read 981 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ....

चिमुकल्या जीवांची, आहेस तू माउली
पदराखाली दिलीस, आभाळागत सावली
निरागस त्या मनाला, दिलास तू आकार
माऊले, तूच त्यांचा आधार........

कोणाचे पाप मारिले, या चिमण्यांच्या माथी
चूक नसताना काही, भोग आले नशिबी
संघर्षाच्या प्रेरणेची, आहेस तू शिल्पकार
माऊले, तूच त्यांचा आधार........

चिखलात रुतलेले, कमळ तू फुलवलेस
दारिद्र्याचे वणव्याचे, निखारे तू विझवलेस
मरणांती वेदानावारती, घातलीस तू फुंकर
माऊले, तूच त्यांचा आधार........

अनाथांना प्रेम दिलेस, जगण्याचे बळ दिलेस
निराश त्या पाखरांना, भरारीचे पंख दिलेस
असंख्य चटके सोसुनी, दूर केलास अंधकार
माऊले, तूच त्यांचा आधार........

अमित सतीश उंडे...
« Last Edit: February 15, 2012, 09:10:32 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sanajy pande

  • Newbie
  • *
  • Posts: 5
Re: माऊले, तूच त्यांचा आधार........
« Reply #1 on: February 12, 2012, 11:13:21 PM »
agadi khare