Author Topic: जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......  (Read 1637 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
शेतकऱ्याचे मनोगत....

भिखेची तिजोरी, पैशाचा तुटवडा
जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......

निसर्गाची साथ नाही,
नशिबाचा हाथ नाही,
दुष्काळाची अवकृपा पाठ काही सोडत नाही,
थकलेल्या हातांनी या, करू कसा सामना,
जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......

उसालाही दर नाही,
कापसालाही भाव नाही,
दोन वेळच्या अन्नाची पण, सोय काही होत नाही,
हरलेल्या जीवाचा या, प्राण काही जाईना,
जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......

प्याकेजच्या नावाखाली केला विकासाचा भास,
मतांचे राजकारणच फक्त, यांच्यासाठी खास
जीवघेण्या या राज्यात, कोंडतोय माझा श्वास,
नाही राहिली आता मला, कशाचीच आस,
दारिद्र्याचे चटके आता, काही केल्या सोसेना,
जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......

अमित सतीश उंडे....   
                 
« Last Edit: February 14, 2012, 10:42:32 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
khup chan mandal aahe shetkaryanch dukkh