Author Topic: हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी  (Read 1201 times)

Offline amitunde

 • Newbie
 • *
 • Posts: 33
राजकारणी अन आपण.......... बरोबर ना.... ???

भ्रष्टाचाराचे रोज नवे प्रकरण ....देशद्रोह्यांचे लांगुलचालन |
जातीच राजकारण करण ....झोळी स्वताची भरण |
देशाचे लचके तोडण ....चालू आहे ताठ मानेन |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |

जवान उपाशी-कसाब तुपाशी ....खेळीतात सैनिकांच्या जीवाशी |
नक्षलवाद्याना धरलय हाताशी ....वैर याचं भारतामातेशी |
घुसलेत अनेक बांगलादेशी....कारवाई न करण्याच ठरवलय मनाशी |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |

स्त्री असुरक्षित....बालके कुपोषित |
गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत |
शेतकऱ्यांना कापत.....स्वारी चालली देश लुटत |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |

महिन्यातून एकदा तिहाराची वारी.....समजतात स्वताला जनतेचे कैवारी |
अन्याय, भ्रष्टाचाराचे पुजारी.....देश विकण्याच्या मार्गावरी |
सत्तेच्या पूर्ण आहारी.....द्यायला हवे यांना फासावरी |
हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |

अमित उंडे

« Last Edit: February 15, 2012, 09:10:08 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...

Offline Bahuli

 • Jr. Member
 • **
 • Posts: 91
 • Gender: Female
Atishay chan kavita!!!!!

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
hummm हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी |