Author Topic: आयुष्याचा अर्थ तरी, कळला असता का........??  (Read 1561 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
सगळच सोडून देता आल असत तर,
धरण्याचा मोह तरी, झाला असता का..... :(
जगणंच इतक सोप असत तर,
सुख-दुखाचा प्रवास तरी, घडला असता का...... :(

पैशानेच सुख-समाधान मिळत असत तर,
त्याग, प्रेम, करुणेचा शब्द तरी, अस्तित्वात असता का..... :P
दुसऱ्याचे पाय खेचून पुढ जाता आलं असत तर,
माणुसकीचा गंध तरी, दरवळला असता का..................... :P

आत्महत्या करून प्रश्न सुटत असते तर,
जगण्यासाठी संघर्ष तरी, करावा लागला असता का.... ;)
सगळाच फुकट मिळालं असत तर,
आयुष्याचा अर्थ तरी, कळला असता का....... ;)

अमित उंडे

« Last Edit: February 15, 2012, 09:09:14 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...