Author Topic: दुखः सहन होत नाही......  (Read 1538 times)

Offline j982279

  • Newbie
  • *
  • Posts: 3
दुखः सहन होत नाही......
« on: February 24, 2012, 09:42:38 PM »
दुखः सहन होत नाही
माय बाप नाही
दुखः सहन होत नाही

माय नाही
बाप नाही
मायेन हाक मारायला कोणी नाही
दुखः सहन होत नाही....

बाप गेला
माय गेली
वडील भाऊ तो आज नाही
ताई ती ही नाही
दुखः सहन होत नाही ....

बाप गेला
जाताना सांगुनी गेला
लेका मी तुझ्या जवळ नाही
असं नाही
मी तुझ्या जवळ नाही मी तुझ्यात आहे

दुखः सहन होत नाही....

माय गेली
जाताना सागुन गेली
बाळा मी तुझ्या जवळ नाही
मी तुझ्या जवळच आहे
मला आता शोधू नको
आर्त हाक मारू नको
नाही आई नाही
दुखः सहन होत नाही ....

वडील भाऊ तो आज नाही
दुखः सहन होत नाही ..

भाऊ गेला
जाता जाता
सबंद आयुष्य देऊन गेला
ते आयुष्य नाही
दुखः सहन होत नाही ....

ताई नाही
गेली ती
जाताना बजावून गेली
दादा मी तुझ्या जवळ नाही
शपत तुला त्या राखीच्या धाग्याची
माझी आठवण ठेव
मला विसरणार तर नाही
दुखः सहन होत नाही ..... जयेश देशपांडे
« Last Edit: February 24, 2012, 09:45:45 PM by j982279 »

Marathi Kavita : मराठी कविता