Author Topic: शर्यत  (Read 881 times)

Offline Omkarpb

  • Newbie
  • *
  • Posts: 42
  • Gender: Male
शर्यत
« on: March 10, 2012, 08:10:21 PM »


शर्यत


एका घनदाट जंगलाचे रहिवासी होते सारे प्राणी,
त्यांच्यातीलच एका खऱ्या ससा-कासवाची हि कहाणी.
पांढराशुभ्र गुबगुबीत ससा खेळत असे दिवसभर,
भूक लागली की मजेत खात असे गवत नाहीतर गाजर.
त्याउलट कासव होते शांत, गंभीर, विचारी, बुद्धिमान,
सिंह राजाचा सल्लागार म्हणून त्याचा जंगलात होता मोठा मान.
दिवस जात-येत होते, ऋतू आपले चेहरे एका मागे एक दाखवत होते,
रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या फांदीवर बसून पक्षी संगीताची मैफल रंगवीत होते,
इतर प्राणीही त्यांना साथ देऊन आपापल्या परीने रंग भरीत होते…

.... पण एक दिवस जंगलाच्या या सुंदर चित्राचा रंग उतरला,
कारण एक माकड माणसांच्या देशी राहून आला.
ससा-कासवाची प्रसिद्ध कथा तिथं त्याच्या कानावर पडली,
फांदीफांदीवर, झाडाझाडावर प्रत्येक गुहेत, बिळात कथेचीच चर्चा रंगली.
सारे प्राणी सशाला येत जाता चिडवू लागले,
पानं-फुलं सुद्धा त्याच्यावर खिदळू लागले.
सशाला चिडवायची संधी माकडांनी कधीच सोडली नाही,
ससा आपल्या बिळात दिवसभर नुसता बसून राही.
पक्ष्यांच्या मैफलीतले सूर हळूहळू बदलू लागले,
प्राण्यांनी त्यात रंग भरणे केव्हाच सोडून दिले.
सशाला चिडवता चिडवता ते एकमेकांचा आदरही विसरले,
भांडण मारामारी हेच जंगलाचे जगणे होऊ लागले.
वाऱ्याबरोबरचे झाडांचे हेलकावणे सुद्धा आता भयाण वाटू लागले,
आकाशात जमणारे ढग सुद्धा अधिक काळे वाटू लागले.

जंगलाचे बदललेले रूप सिंह राजाच्या लक्षात आले,
त्याने कासवालाच यावर तोडगा काढण्यासाठी पाचारण केले.
जंगलाचे रूप पूर्ववत होण्यासाठी प्राण्यांना एकत्र आणणे आवश्यक होते,
त्यासाठी जेथून सुरवात झाली तिथेच शेवट करणे भाग होते.
कासवानं दुसऱ्याच दिवशी दवंडी पिटवली,
ससा कासवाच्या खऱ्याखुऱ्या शर्यतीची कल्पना साऱ्यांनाच आवडली.
जिंकायची शेवटची संधी मानून सशाने आपणहून शर्यतीमध्ये उडी घेतली,
ह्या ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार व्हायला सारी प्राणिजात पठारावर जमली.
सशाने कासवाला हरवायचच असा निश्चय केला,
कासावानेही सशालाच जिंकावायचं असा निश्चय केला.
पोपटाने शिट्टी मारली आणि शर्यत सुरु झाली,
सशांना एक टुणकन उडी मारून धूम ठोकली,
त्यावेळी कासवाचं मंद हसू खूप काही बोलून गेलं.

धावता धावता ससा पुरा थकून गेला,
तलावाच्या काठी पाणी पीत विचार करत राहिला,
" आता मी जिंकणार, कासवाला मी हरवणार,
सर्व प्राणी मला चिडवणं सोडणार, माझा आदर करणार"
असा विचार करत ससा आपलं गोंडस रूप पाण्यात पाहत राहिला,
एवढ्यात एक चमत्कार झाला, पाण्यातल्या ससा चक्क त्याच्याशीच बोलू लागला.
" तुझ्या जिंकण्याला काय बरं किंमत आहे?
कासवाला हरवण्यात काय बरं मोठेपणा आहे?
गोष्टीमध्ये कासव शर्यत मान्य करतो, कारण तो धीट होता,
तो शर्यत जिंकतो, कारण त्याच्या मध्ये चिकाटी होती.
तू ही शर्यत जिंकलास तर ती कथा मरेन, आदर्श मरेन,
नवीन आव्हान स्वीकारण्याची उमेदही मरेन,
नशिबाने तुला बिनडोक आळशी केले,
पण कासवाकडे पाहून सारे शहाणे तर झाले....."
डुलणाऱ्या पानांबरोबर ससा हेलकावे खात राहिला.
पाण्यातल्या आपल्या प्रतिबिंबाकडे पाहत राहिला.........

इकडे कासव पठारावर पोहचला,
त्याला पाहताच सर्वांनी एकंच जल्लोष केला,
ससा कसा नाही आला ह्याचे त्याला आश्चर्य त्याला वाटले,
त्याचे डोळे सशाचाच वेध घेऊ लागले,
सशाला मूर्ख ठरवून सारे प्राणी हसत निघून गेले,
कासव रात्रीला सोबत करत सशाची वाट पाहत तिथेच बसून राहिले,
जंगल शांत झाले ,
जंगलावर दाटलेले ढगही स्वच्छ झाले,
पण अनेक दिवस गेले, महिने सरले ससा काही आला नाही,
सशाच्या बिळासमोर बसून वाट पाहणे कासवाने कधी सोडले नाही.....
कासव आजकाल प्राण्यांना सल्ले द्यायचे टाळतो,
सशाच्या आठवणीत अश्रू ढाळीत राहतो,
आणि शर्यतीचा विषय निघताच -
आपल्याच पाठीत तोंड खुपसून बसून राहतो ......
-    ओंकारबडवे
« Last Edit: March 10, 2012, 09:11:44 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता

शर्यत
« on: March 10, 2012, 08:10:21 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: शर्यत
« Reply #1 on: March 12, 2012, 11:45:12 AM »
ekdam vegla drushtikon dakhvlaat .... khup chan.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):