Author Topic: माझी गाणी : सावज  (Read 710 times)

Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
माझी गाणी : सावज
« on: March 13, 2012, 03:25:23 PM »
सावज

तुझ्या चंचल मनाचे अखेर
मी हि एक सावज रे

तुजकडे बघुनी यौवन फुलले
तुझ्या मधुर शब्दांना भुलले
दिनरात तुझ्या कवेत झुलले
घेउनी मातेचा शाप
एकलेच ते आता रे

का धरावा तुजवरी मी रोष
देते मी माझ्या मनास दोष
का पडला त्यास प्रणयाचा शोष
माहित असुनी धावले ते
मृगजळा कडे रे

ठेवुनी तुझ्या वर फुका विश्वास
तुझ्या श्वासात मिसळला मी श्वास
रोखू न शकले वासनेच्या अश्वास
ठेउनी मागे पाऊल खुणा
दौडत पुढे गेला रे

---प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझी गाणी : सावज
« Reply #1 on: March 14, 2012, 11:06:32 AM »
सावज ...... chan kavita

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: माझी गाणी : सावज
« Reply #2 on: March 15, 2012, 05:11:34 PM »
Surekh.......... :)