Author Topic: एवढीशी चिमूरडी ती....  (Read 1015 times)

Offline karan jadhav

  • Newbie
  • *
  • Posts: 24
एवढीशी चिमूरडी ती....
« on: March 15, 2012, 11:09:45 AM »
एवढीशी चिमूरडी ती
बोबडे बोल बोलायची
तुरूतुरू चालायची
दुडूदुडू धावायची...

लळा लावला होता तीनं
सार्याना..आपल्या हसण्याचा
छान-छान दिसण्याचा...

सार्यांची लाडकी ती
जो-तो उचलून घ्यायचा तीला
एखादं चॉकलेट देऊन
गोड-गोड पापा घ्यायचा तीचा..

एवढीशी चिमूरडी ती,
बघाना.. आता वयात आलेय,
फुललेय...
गुलमोहरासारखी बहरलेय...

आजही ती, तशीच हसते-बोलते
सार्याना आपला लळा लावते
चॉकलेट बदल्यात पापा देणारी ती
कदाचित...

चॉकलेट बदल्यात पापा देणारी ती
आज बापाच्या जीवाला घोर लावते...
बापाच्या जीवाला घोर लावते...

=====================================

करण जाधव..[एका बापाच्या भूमिकेतून...]

======================================

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: एवढीशी चिमूरडी ती....
« Reply #1 on: March 15, 2012, 01:03:29 PM »
wow.... hi suddha ek baaju aahe.

Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Re: एवढीशी चिमूरडी ती....
« Reply #2 on: March 15, 2012, 05:29:20 PM »
wow .....................this poem should be dedicated to all the loving fathers :)

Offline karan jadhav

  • Newbie
  • *
  • Posts: 24
Re: एवढीशी चिमूरडी ती....
« Reply #3 on: March 16, 2012, 11:03:33 AM »
asech vachat raha...mhanje ankhi chagle lihita yete :) Thnx 4 appreciation  ;)