Author Topic: चेंगराचेंगरी.........  (Read 707 times)

Offline amitunde

  • Newbie
  • *
  • Posts: 33
चेंगराचेंगरी.........
« on: March 17, 2012, 08:31:17 AM »
चेंगराचेंगरी.........  :(

अंगणी विधात्याच्या, नको आघात दुखांचे
भान ठेऊनि कर्तव्य व जबाबदारीचे
आपणच रोखूया संकट चेंगराचेंगरीचे............||१||

पाळूनी नियम रांगेचे
सहाय्य घेऊया स्वयंसेवकांचे
घडवुनी दर्शन स्वयंशिस्त व स्वयंप्रेरणेचे
आपणच रोखूया संकट चेंगराचेंगरीचे ..........||२||

शमवूया वादळ अफवांचे नि
अफवा पसरविणाऱ्या दानवांचे
जपुनी पावित्र्य माणुसकी व नीतीमत्तेचे
आपणच रोखूया संकट चेंगराचेंगरीचे ..........||३||

आत्मसात करुनी शिकवण वारकऱ्यांची
दान अर्पूया चांगल्या विचारांचे
देऊनी देवालाही चार क्षण आनंद व समाधानाचे
आपणच रोखूया संकट चेंगराचेंगरीचे ..........||४||

Amit Satish Unde, Sangli..........

Marathi Kavita : मराठी कविता

चेंगराचेंगरी.........
« on: March 17, 2012, 08:31:17 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: चेंगराचेंगरी.........
« Reply #1 on: March 18, 2012, 08:36:19 PM »
chan kavita

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):