Author Topic: मनाची मांडणी  (Read 985 times)

Offline kalpana shinde

  • Newbie
  • *
  • Posts: 17
मनाची मांडणी
« on: March 26, 2012, 04:21:01 PM »
मनाची मांडणी

आज पासून मीही ठरवलंय
तुला नाही आठवायचं
चुकून आठवण आलीच  तर
मनातल्या मनात रडायचं 

मनातले दुक्ख कधी
चेहर्यावर नाही आणायचं
दाटले कधी डोळे अश्रूनि
तरीही खोटे खोटे हसायचं

आत्ता नाही घाबरायचं
संकटाना एकटीने सामोरे जायचं
जरी असेल एकटी    मी
स्वतहाला strong  बनवायचं

तुझी माझी वाट वेगळी
एकट्याच वाटेवर चालायचं
रस्ता नवीन असला तरी
ध्येय आपले गाठायचं

आत्ता नाही मागे वळायच
मृगजळ नाही शोधायचं
प्रवास फक्त आपलाच असतो
आपणच पूर्ण करायचा असतो

कल्पना एस .(मोना) २६.०३.२०१२.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: मनाची मांडणी
« Reply #1 on: March 26, 2012, 05:39:24 PM »
tu chan kavita kartes